AACCI

सेवा आरोग्य फाउंडेशनचा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न!

सेवा आरोग्य फाउंडेशनचा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न!

🌼 सेवा आरोग्य फाउंडेशनचा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न! 🌼
दिनांक २८ मे २०२६ रोजी समाज मंदिर सभागृह, हिंगणे होम कॉलनी, पुणे येथे सेवा आरोग्य फाउंडेशनच्या वस्तीमध्ये कार्यरत ७८ महिला कार्यकर्त्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्मिता बेलापूरकर, डॉ. संपदा तांबोळकर आणि दीपक अष्टपुत्रे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा आरोग्य फाउंडेशनच्या संचालिका डॉ. हर्षदा पाध्ये यांनी केले. त्यांनी महिला कार्यकर्त्यांची समाजातील भूमिका अधोरेखित करत प्रशिक्षणामागील उद्देश स्पष्ट केला.
AACCI संस्थेच्या तज्ञ डॉक्टर आणि सहकाऱ्यांनी जीवन कौशल्ये, मानसिक स्वास्थ्य, भावना व्यवस्थापन, संवाद कौशल्ये आणि किशोरवयीन मुलांच्या समस्या हाताळण्याचे तंत्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्व-जाणीव, SWOT विश्लेषण, भावनांचे व्यवस्थापन, ताण-तणाव नियंत्रण, किशोरवयीन मेंदूचा विकास आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व यांसारख्या विषयांवर सहभागी महिलांशी संवाद साधण्यात आला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


DR. SWATI YASHWANT BHAVE - ANUBHAVATUN ANUBUTI (KHAND 1 VA 2)

Not Just a Paediatrician : Lessons Learnt through Life’s Twists and Turns

New Event
EMBRACE THE JOURNEY. READ THE INSPIRATION.